आजारपणाबद्दल अमिताभ बच्चन यांनीच केला खुलासा! म्हणाले, "माझी प्रकृती..."

    16-Mar-2024
Total Views | 49
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल खुद्द त्यांनीच दिली भन्नाट प्रतिक्रिया
 

Amitabh Bachchan 
 
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या तब्येतीबद्दल १५ मार्च रोजी एक महत्वाची बातमी समोर आली होती. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, आता स्वत: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी या बातमीवर प्रतिक्रिया देत ती बातमी फेक असल्याचे म्हटले आहे. काल म्हणजेच १५ मार्च रोजी अमिताभ बचच्न ISPL सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यावेळी त्यांच्यासोबत (Amitabh Bachchan) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि अभिषेक बच्चन देखील होते.
 
हे वाचलंत का? - अमिताभ बच्चन १०० रुपयांची नोट पाहून निघून गेले, कमलेश यांनी सांगितला ‘खाकी’च्या सेटवरचा किस्सा  
 
दरम्यान, अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टीची बातमी समोर आल्यावर सगळेच जण चिंतेत होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत कायम कृतज्ञ असेन असेही म्हटले होते. परंतु, ISPL चा सामना पाहायला गेल्यावर त्यांनाच या बातमीबद्दल विचारले असता ही बातमी फेक आहे असे त्यांनी म्हटले. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ नियमित चेकअपसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांची कोणतीही अँजिओप्लास्टी झाली नाही असे समोर येत आहे. एकूणच काय तर अमिताभ बच्चन यांनी प्रकृती पुर्णपणे बरी असून ते यापुढे देखील आपल्याला विविध भूमिकांमधून दिसतील यात शंका नाही.
 
अमिताभ बच्चन काही महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'गणपथ' चित्रपटात झळकले होते. याशिवाय गेल्या काही वर्षांत त्यांनी 'उंचाई', 'गुडबाय', 'ब्रम्हास्त्र', 'झुंड', या चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता आगामी 'कल्की २८९८ एडी', 'सेक्शन ८४' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'थलायवर १७०' या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121