मुंबई: वाढत्या तंत्रज्ञानाबाबत सायबर सिक्युरिटीचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे वेळोवेळी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.शनिवारी एल अँड टी कंपनीला महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून मिळाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.एल अँड टी इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कंपनीकडून ' पहिल्यांदा ' ८०० कोटींची निविदा जिंकण्याचे स्पष्ट केले.
कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितले आहे की,एलटीटीएस (LTTS) व केपीएमजी (KPMG) एशुरन्स व कन्सल्टिंग सर्विसेस एलएलपी यांच्या सांघिक कामगिरीतून एकत्रपणे या प्रकल्पावर काम केले जाणार' असे सांगितले आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच सर्वसामान्य माणसांना सायबर सिक्युरिटी पुरवून सायबर धोके टाळता येऊ शकतात असेदेखील म्हटले आहे.
आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर ए आय (Artificial Intelligence) बरोबरच स्टेट ऑफ आर्ट (अव्वल दर्जाच्या) डिजिटल फॉरेन्सिक टूल्सचा वापर सहयोगाने या प्रकल्पात केला जाणार आहे. विशेषतः डीपफेक, मालवेअर,आयओटी इन्व्हेटिगेशन, ड्रोन, फॉरेन्सिक, ब्लॉकचेन अशा प्रकारच्या अनेक यंत्रणासाठी तिन्ही संस्था एकत्रितपणे काम करणार असून सायबर क्राईममधील शोधमोहीम अधिक सोपी होऊ शकते असे निवेदनात म्हटले आहे.
सेंट्रल इर्मजनसी रिस्पॉन्स टीम (CERT) यंत्रणेचा वापर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी होणार आहे.आलेल्या तक्रारी, निर्देशनात आलेल्या डेटा ब्रीच,डार्कनेटमधील अँडव्हरसरी इंटेलिजन्स या विविध उद्देशीय कार्यक्रमासाठी या भागीदारचा उपयोग सर्वसामान्यांना होणार आहे.
अत्याधुनिक सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी कुशल सायबर टीमसह AI आणि ML तंत्रज्ञानाद्वारे सुदृढ SOC एंडपॉइंट डिटेक्शन आणि प्रतिसाद, SIEM, SOAR, UEBA, ZTNA, CASB, DLP, NAC, DNS सुरक्षा, IDAM आणि PAM सोल्यूशन्स हाताळते.