आज निरीक्षणासाठी महत्वाचे समभाग कुठले जाणून घ्या..

    01-Mar-2024
Total Views | 61
stock market
 
 
आज निरीक्षणासाठी महत्वाचे समभाग कुठले जाणून घ्या.....
 
 
मुंबई: विविध घडामोडींमुळे काल शेअर बाजारात उसळी पहायला मिळाली होती. त्याच धर्तीवर आजच्या दिवसातील महत्वाचे समभाग (शेअर) कुठले असू शकतात ते जाणून घेऊया...
 
आज सकाळच्या सत्रात ओपनिंग बेलनंतर शेअर बाजारात सेन्सेक्स १९५.४२ अंशाने वाढत (०.२७%) ७२५००.३० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५०, ३१.६५ अंशाने वाढत २१९८२.८० पातळीवर पोहोचला आहे.
 

आजचे महत्वाचे समभाग -
 

१) पेटीएम - पेटीएम पेमेंट बँक व पेटीएम आपले अंतर्गत करार मोडत आर्थिक व्यवहार स्वतंत्र करणार असल्याचे रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. सकाळच्या सत्रात ४ टक्क्यांहून अधिक पेटीएम समभागात वाढ झाली होती. आज अखेरचा सत्रात समभागात उसळत वाढेल किंवा स्थिर राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
२) डिश टीव्ही - डिश टिव्हीने (बीएनपी परिबस आरबिट्रेज) ने आपले २८४४६,३५१ इक्विटी समभाग सरासरी २१.०५ प्रति समभाग रुपयाने विकले होते. काल डिश टीव्ही समभाग निफ्टी, सेन्सेक्स मध्ये घसरला होता. पुढील बाजारातील समभागांची हालचाल पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
३) ऑटो समभाग - आज १ मार्चपर्यंत वाहन कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्याची शक्यता असताना आज ऑटो निर्देशांक किती प्रमाणात बदलतो हे पाहणे निश्चित महत्वाचे ठरणार आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीला ऑटो स्टॉकमध्ये २६६.६० अंशाने वाढत निफ्टी ऑटो २०६७४.९० पातळीवर पोहोचला होता. दुपारच्या व संध्याकाळी सुरूवातीला Q3 ( तिमाही) निकालाचे स्वागत गुंतवणूकदार करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
४) वेदांता - काल सुप्रिम कोर्टात वेदांचा कंपनीची टुटीकोरीन प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेली जनहित याचिका फेटाळली आहे. त्यामुळे याबद्दलचे भागभांडवरधारकांची प्रतिक्रिया शेअर बाजारात कशी उमटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
५) रसायन कंपन्यांचे समभाग - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रसायनांच्या उत्पादनावरील सबसिडी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पी अँड के (पोसफाटिक,पोटासिक) रसायनांवर २४४२० रूपयांची सबसिडी सरकारने मंजूर केली आहे.
 
६) तेल गॅस समभाग - सरकारने विंडफॉल करात वाढ केल्याने या समभागात नक्की काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.सरकारने विंडफॉल टॅक्स (कर) ३००० रूपये प्रतग टनवरून वाढवत ४६०० रूपये प्रति टन वाढवला आहे.
 
७) अदानी एंटरप्राईजेस - अदानी एंटरप्राईज कंपनीने आपला विझाग या उपकंपनीतील समभाग हिस्सा आपल्या अदानी इन्फ्रास्ट्रक्चर व डेव्हलपर कंपनीत वळवला होता. यामुळे गुंतवणूक अदानी एंटरप्राईजचा समभागात काय कौल देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121