एसएनडीटी महिला विद्यापीठात जगराणी विशेष व्याख्यानमाला संपन्न!

    23-Feb-2024
Total Views | 58

SNDT
 

मुंबई :
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (SNDT) सर विठ्ठलदास ठाकरसी विद्याविहार (जुहू आवार) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी जगराणी विशेष व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडला. ‘भारतीय महिला ऋषींचा बौद्धिक वारसा’ असा या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक जयंत कुलकर्णी आणि अधिष्ठाता महेश भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, भारतीय ज्ञान, संस्कृत एवं योग केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्र तिवारी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आस्था मेहता उपस्थित होत्या.
 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयंत कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित करताना मागील चार दशकांमध्ये प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन यांच्या माध्यमातून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत केल्या जाणाऱ्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे सुरु असलेले कार्य आणि समाजाचे नेतृत्व करण्यासाठी महिलांमध्ये असलेली क्षमता यावर भाष्य केले. तसेच जयंत कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना भारतीय ऋषीकांच्या जीवानावर असलेली पुस्तके वाचण्याचे आवाहन केले.
 
विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जगराणी प्रकल्पाविषयी उपस्थितांना संबोधित केले. या प्रकल्पाद्वारे ३५ भारतीय ऋषीकांच्या कार्याचा संच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठामार्फत सातत्यपूर्ण संशोधनातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींना प्रेरित करणे, ऋषीकांच्या ज्ञानाचा परिचय करून देणे आणि देशाचा गौरवशाली इतिहास पुनरूज्जीवीत करणे हा प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय हजारो वर्षापूर्वी विकसित झालेल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृती निर्माण आणि विकासामध्ये असलेल्या महिलांचा सहभाग आणि कार्यभाग याचे संशोधन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असलेल्या भारतीय ज्ञान व्यवस्था या घटकाशी हा प्रकल्प जोडला जाणार असून या प्रकल्पामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ०२ श्रेयांक (क्रेडीट) चा लाभ होणार आहे. ‘नारी ते नारायणी’ हा प्रकल्पाचा विषय असून यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना ३० तासाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षित विद्यार्थिनींमार्फत ५ लाख नवीन विद्यार्थिनींपर्यंत पोचण्याचा मानस प्रा. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केला. विकसित भारत @ २०४७ मिशनला विद्यापीठ चालना देत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय ज्ञान, संस्कृत एवं योग केंद्राच्या प्रा. वत्सला यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी आस्था मेहता यांनी कथाकथनाच्या माध्यमातून भारतीय महिला ऋषी परंपरेतील विदुषी ‘घोषा काक्षीवती’ आणि ‘इंद्रमातर:’ यांच्या जीवन परिचयाविषयी माहिती दिली. तसेच सामान्य स्त्रिया आणि दासी यांच्या माध्यमातून सैन्य उभारणाऱ्या आणि शस्त्र कलेत पारंगत असणाऱ्या राणी विश्वला यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
 
या क्रार्यक्रमाला आंतरविद्या शाखेच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा. जयश्री शिंदे, वाणिज्य शाखेच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा. शोभा देढिया, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. योगेश नेरकर आणि आसर विठ्ठलदास विद्याविहार जुहू आवाराचे प्रमुख प्रा. राजेश वानखेडे तसेच जुहू आवारातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमास जुहू आवारातील ४०० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.


अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121