मुंबई: सोनी म्हणजेच क्लव्हर मॅक्स एंटरटेनमेंटने झी बरोबरच विलीनीकरण फिसकटल्यानंतर सोनीने मात्र भारतातील व्यवसायाबाबत सकारात्मक विधान केले आहे. झी बरोबर करार मोडला असला तरी कंपनी भारतातील गुंतवणूकीबाबत सकारात्मक असल्याचे सोनीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारतातील नैसर्गिक व आगामी शक्य त्या मौल्यवान संधीचा सोनी सकारात्मक दृष्टिकोनात विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याविषयी बोलताना सोनी इंडियाचे हिरोकी टोटोकी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ' भविष्यातील व्यवसायिक संधी निर्माण करण्यासाठी भारत ही महत्वाची बाजारपेठ आहे. जरी हे डील (झी) झाले नसले तरी संभाव्य रुपात आम्ही भारतातील नव्या संधीसाठी आशावादी आहोत.
झी व सोनी यांच्या विलीनीकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर हा करार संपुष्टात आला होता. झी कंपनीचे सीईओ पुनित गोयंका यांना नवीन संस्थेचे चेअरमन होण्यास विरोध दर्शविला होता. विलीनीकरणात तरतूदीत जापनीज कंपनी सोनीला १.५ अब्ज डॉलर नवीन कंपनीत गुंतवणूक करणे अपेक्षित होते. झी कडून तरतूदींचे पालन झाले नसल्याचा आरोप यावेळी सोनीकडून करण्यात आला होता. या भांडणात झीने एनसीलटी ( नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) मध्ये सोनी विरूद्ध धाव घेतली होती. एसआयएसीकडून केलेल्या प्रस्तावानुसार ७४८.५ कोटी रूपये स्थगित करण्यात आले होते.
एनसीलटीकडे गेल्यावर हे विलीनीकरण व्हावे यासाठी झीने मागणी केली. परंतु एनसीलटीकडे सोनी ग्रुपने नुकसानभरपाई मागणीला सिंगापूर इंटरनॅशनल आरबिट्रेशन सेंटर (एसआयएसी) ने झी ने एनसीलटीकडे केलेल्या प्रस्तावाला स्थगिती देण्यास मनाई केली होती. मुंबईतील एनसीलटीचा खंडपीठाने याबाबत आधीच सोनीला नोटीस बजावली होती.
सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया ( एसपीएनआय) ची सध्या भारतात २६ टीव्ही चॅनल्स अस्तित्वात आहेत. याशिवाय सोनी लिव हा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. सोनीने गेल्या आर्थिक वर्ष २३ मध्ये ६६८४ कोटींची महसूल प्राप्त केला होता.