भास्कर जाधवांना निवडणुकीसाठी १५ लाख रुपये दिले! 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

    10-Feb-2024
Total Views | 88

Bhaskar Jadhav


सिंधुदुर्ग :
भास्कर जाधवांना निवडणुकीसाठी १५ लाख रुपये दिले, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
नारायण राणे म्हणाले की, "कोण तरी भास्कर भाडोत्री आणतात. राणेंविरुद्ध काहीही बोला. मी काही त्यांना उत्तर देणार नाही. पण एक दिवस चोप तर देणार. मी असं कुणाला सोडणार नाही. माझे १५ लाख रुपये निवडणुकीसाठी घेतले आणि अजुनपर्यंत परत केले नाही. आता तेच माझ्यावर टीका करत आहेत."
 
पुढे ते म्हणाले की, "साहेबांना सांगून त्यांना मी तिकीट दिली. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, दादा प्रचाराला पैसे नाहीत. त्यावेळी मी त्यांना एकदा १० लाख आणि एकदा ५ लाख असे १५ लाख रुपये दिले. पण अजूनही परत केले नाहीत आणि माझ्यावर टीका करत आहेत," असेही ते म्हणाले.




अग्रलेख
जरुर वाचा
शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121