सुवर्ण मंदिर परिसरात सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार

ढाव फसला; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    04-Dec-2024
Total Views |
 
 
Sukhbir Singh
अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh)  यांनी बुधवारी सकाळी मुंडण केले. यावेळी दहशतवादी नारायण सिंह चौरा याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तनखैया तपश्चर्या करत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा खलिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ज्याठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्याठिकाणी विक्रमसिंह मजिठियाही उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे, श्री अकाल तख्त साहिबने दोन दिवसांधी २ डिसेंबर रोजी एका शिक्षा घोषित केली होती. तेव्हा सुखविंदर बादल हे सुवर्ण मंदिरातच होते. व्हिलचेअरवर बसून त्यासोबतच निळा सेवेसाठी असलेला गणवेशात ते दिसत होते. हातात भला मोठा भाला घेऊन शिक्षा भोगत होता. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे व्हीलचेअऱने बांधण्यात आले होते.
 
याप्रकरणात माध्यमांशी बोलत असताना हरपाल सिंह म्हणाले की, सुवर्ण मंदिरात चौख सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, चौरा त्याआधी सुवर्ण मंदिरात होते. बादलवर गोळीबार करण्याआधी त्यांनी गुरूनानक यांना वंदन केल्याचे एडीसीपी सिंह यांनी माहिती दिली आहे. तसेच शिवाय गोळीबारामध्ये उपस्थितांपैकी कोणत्याही व्यक्तीस दुखापत झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली नाही.
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे ट्विट
 
 
 
याप्रकरणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घटनास्थळी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. बादल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी X ट्विटरवर पंजाबी भाषेमध्ये एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, पंजाब पोलिसांनी आज मोठा अनर्थ टळण्यासाठी जबाबदारी घेत चांगली कामगिरी केली आहे. पंजाब पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. मी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. सुखबीर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. याप्रकरणाची तातडीने चौकशी करा अस अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना मी पोलिसांना दिल्या आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121