भारतीय रेल्वेची मेगा भरतीच्या लेखी परीक्षा संपन्न

गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आणि तांत्रिक श्रेणी या दोन्हीतील रिक्त जागांसाठी भरती

    02-Dec-2024
Total Views | 9

railway


मुंबई, दि.2 : प्रतिनिधी 
भारतीय रेल्वेने अलीकडेच विविध झोन, विभाग आणि कार्यशाळा यामधील गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आणि तांत्रिक श्रेणी या दोन्हींमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली होती. देशभरातील २१ रेल्वे भर्ती बोर्डमार्फत ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. या भरती मोहिमेत सहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, कमर्शियल क्लर्क, ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनमधील विभागीय सहाय्यक या पदांचा समावेश करण्यात आला होता.
या आठवड्यात, दि. २५ ते २९ नोव्हेंबरपर्यंत, लेखी परीक्षा २९ राज्यांमधील १५६ शहरांमध्ये ३४६ केंद्रांवर दररोज तीन शिफ्टमध्ये घेण्यात आली. परीक्षेत प्रति शिफ्ट अंदाजे १.२२ लाख उमेदवार सामावून घेण्याचे ठरले होते, ज्यामुळे दररोज सुमारे ३.६८ लाख उमेदवारांची परीक्षा घेण्याचे नियोजन होते, एकूण १८.४ लाख उमेदवार पाच दिवसांमध्ये उपस्थित राहतील अशी व्यवस्था केली होती. तथापि, वास्तविक प्रति शिफ्ट अंदाजे ७३,०० -७७,००० उमेदवार उपस्थित होते, ज्याद्वारे दररोज सुमारे २.२२-२.३० लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. एकूण ११,४०,९३१ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर ६,९९,४१६ उमेदवार गैरहजर नोंदले गेले. रेल्वे भरती मंडळाने (RRB) ने नोंदणीकृत उमेदवारांपैकी ६२% उमेदवारांच्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या.
आधार (UIDAI)-आधारित प्रमाणीकरण (फिंगरप्रिंट आणि IRIS) वापरून १०,४२,९५५ उमेदवारांची (९१%) यशस्वी पडताळणी ही या परीक्षेची एक उल्लेखनीय कामगिरी होती. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, परीक्षेच्या पहिल्या दिवशी (२५.११.२०२४) रोजी आधार प्रमाणीकरण (AUA) कनेक्शन/सर्व्हर समस्यांमुळे कमी टक्केवारी आली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121