बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्या अत्याचाराविरोधात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने कुर्ल्यात निदर्शने
13-Dec-2024
Total Views |
मुंबई : बांगलादेश येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजावरील होणार्या हिंसक अत्याचाराविरोधात गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘महाएमटीबी’ ( MTB )च्यावतीने कुर्ला पश्चिम आणि पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर फलक निदर्शने करण्यात आली. या हिंसक अत्याचाराविरोधात फलक निदर्शन, हे येथील नागरिकांसमोर जनजागृतीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसरासारख्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी बांगलादेश येथील हिंदूंवरील होणार्या अत्याचाराचे गांभीर्य लोकांना निदर्शनास आणून देताना उपस्थित कार्यकर्ते जितेंद्र संसारे, निलेश झंजे, तुषार भोळे, आशिष यादव, प्रथमेश आचरेकर आणि कुर्ला येथील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.