वनवासींचे आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव : नरेंद्र मोदी

    05-Nov-2024
Total Views | 43
NM
 
नवी दिल्ली : ( Narendra Modi ) “वनवासींच्या आरक्षणास प्रथम पं. नेहरू यांनी विरोध केला होता. त्यानंतर आता काँग्रेसने पुन्हा वनवासींचे आरक्षण रद्द करण्याचा डाव आखला आहे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यांनी गढवा आणि साईबासा येथे जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला धारेवर धरले. पंतप्रधान म्हणाले की, “वनवासींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वनवासी आरक्षण सुरू केले होते. मात्र, त्यावेळीही पं. नेहरू यांनी वनवासींच्या आरक्षणाला विरोध केला होता.
 
त्यानंतर जेवढी वर्षे सरकारवर गांधी घराण्याचे नियंत्रण होते, ते सर्व आरक्षणाच्या विरोधात राहिले. आता पुन्हा या लोकांनी वनवासींना दिलेले आरक्षण रद्द करणार असल्याचे उघडपणे जाहीर केले आहे. भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणास कोणासही हात लावू देणार नाही,” अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. झारखंडमध्ये सत्ता आल्यानंतर घुसखोरीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

ते पुढे म्हणाले, “बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी वनवासी मुलींच्या नावावर परत करण्यासाठी कायदा आणला जाईल. घुसखोर हे वनवासींची भाकरी हिसकावत आहेत; ते तुमची मुलगी हिसकावत आहेत आणि ते तुमची मातीही हिसकावत आहेत. झामुमो-काँग्रेस-राजदचे हेच धोरण असून त्यामुळे राज्यातील वनवासी समुदायावर संकट उभे राहिले आहे. वनवासी समाज आणि देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे. त्यामुळे ही घुसखोर युती एकमताने उखडून टाकावी लागेल,” असेही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले आहे.युती एकमताने उखडून टाकावी लागेल,” असेही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121