कुमार आयलानी यांना साई पार्टीचा पाठिंबा

    04-Nov-2024
Total Views | 32
Kumar Ailani

उल्हासनगर : उल्हासनगरच्या स्थानिक राजकारणात वेगळी ओळख असलेले साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुमार आयलानी Kumar Ailani यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

शनिवार, दि. २ नोव्हेंबर रोजी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी शहरातील व राज्यातील विकासकामे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार कुमार आयलानी उपस्थित होते. “साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आमची ताकद आणखी वाढली आहे, याचा मला खूप आनंद झाला” असल्याचे कुमार आयलानी यांनी सांगितले. शहराच्या राजकारणात साई पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे.

जीवन इदनानी म्हणाले की, उल्हासनगर शहराचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकासकामे झाली आहेत. राज्य सरकारने शहराच्या विकास कामांसाठी भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे आम्ही महायुतीच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत.

यावेळी आमदार कुमार आयलानी म्हणाले की, “आमच्या सरकारने शहरात गोरगरीब जनतेसाठी दोनशे खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल, ४०० कोटी रुपयांची ‘भुयारी गटार योजना’, एमएमआरडीएच्या माध्यमातून शहरातील काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. परिवहन सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्व नगरसेवकांना आपापल्या भागाच्या विकासासाठी महायुती सरकारने एक कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यातून अनेक विकासकामे झाली आहेत.

पवई येथे एसडीओ कार्यालय, एसीपी कार्यालय एकच ठिकाणी असून लवकरच शहरात आरटीओ कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अँटिलियामध्ये नदीच्या काठावर १९ एकर जागेवर शहरातील नागरिकांसाठी भव्य उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, इनडोर व आऊटडोर मुलांच्या खेळासाठी क्रीडांगण तयार करणार आहे.

कार्यक्रमात शहराच्या माजी महापौर आशा इदनानी, विधानसभा निवडणूक प्रमुख जमनादास पुरस्वानी, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राजेश वधारिया, प्रकाश माखिजा, इंदिरा उदासी, डॉ. महेश गावडे, सुनील गंगवानी, मनोहर खेमचंदानी, राजू जग्यासी, लाल पंजाबी, भाजप व साई पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121