आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन

    15-Nov-2024
Total Views | 22
J P Nadda

ठाणे : महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा ( J P Nadda ) यांनी केले.

ठाण्यातील एम.एच. हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी.नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवडयाचे उमेदवार प्रताप सरनाईक, आमदार ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाई आमदार भास्कर वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

गुरुनानक जयंतीचे औचित्य साधुन जे.पी.नड्डा यांनी ठाण्यातील गुरुदवारामध्ये तसेच ठाणेकरांचे ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटले की घराणेशाही, तुष्टीकरण होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालुन राजकारणाची परिभाषा बदलुन टाकली आहे. या आधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा, विरोधक कमजोर होते. पण नरेंद्र मोदींनी मजबुत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आल्याचे सांगून जे.पी.नड्डा यांनी, हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाजासमाजात फूट पाडतात. याऊलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशानाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात... जग आमच्या असहमतीचाही आदर करत आहे. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला आहे.तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले.

देशातील आणि राज्यातील विकास कामे आणि विविध योजनांचा उहापोह करून नड्डा यांनी, करोडो युवांचा हा भारत देश आहे. सबका साथ सबका विकास करीत असताना पदपथावरील प्रत्येक गरीबासाठी राहण्याची भोजण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिनच्या सरकारमुळे विकास धरतीवर उतरला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ते अटल सेतु असे सर्वच प्रकल्प त्यांनी रोखले. लाडकी बहिण योजने विरोधातही ते न्यायालयात गेले. ही मंडळी आघाडी म्हणवतात आणि पिछाडीचे काम करतात. म्हणुन २० नोव्हे. ला यांना रोखण्याचे काम करून घरी बसवा. असे आवाहन नड्डा यांनी केले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121