"हमास दहशतवादी असेल तर महात्मा गांधीही दहशतवादी आहेत!", जरांगेंच्या शेजारी बसणाऱ्या मुस्लीम धर्मगुरूची वादग्रस्त विधाने
01-Nov-2024
Total Views | 411
मुंबई : मौलाना यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हि़डिओत काही मौलानाने महात्मा गांधींची तुलना ही दहशतवाद्यांशी केली आहे. ते म्हणाले की, जर हमास दहशतवादी असेल तर महात्मा गांधीही दहशतवादी आहेत, असे बेजबाबदार वक्तव्य मौलानाने केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या जुन्या वक्तव्यांचाही हवाला देण्यात आला आहे. बेताल वक्तव्य केलेल्या मौलानाचे नाव हे मौलाना सज्जाद नोमानी आहे.
गांधी हे महामानव असू शकतात, परंतु ते एका मुस्लिमापेक्षाही वाईट आहेत, कारण फक्त मुस्लिमांनाच स्वर्ग मिळेल, तर गांधी नरकात जातील. यातून मौलानांची कट्टरवादी विचारसरणी समोर आली. दरम्यान मौलाना यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही मौलाना महात्मा गांधीची तुलना दहशतवादाशी करताना म्हणतात, की जर हमासला दहशतवादी संघटना म्हटले तर महात्मा गांधीही दहशतवादी होते. हा व्हिडिओ शेअर करताना ट्विटर यूझरने भारतीय मौलाना जोहर अली यांच्या वर्षानुवर्षे जुन्या विधानाच हवाला दिला आहे. ज्यात मौलाना जोहर यांनी म्हटले की, गांधी हे महामानव असू शकतात, परंतु एका वाईट मुस्लिमांपेक्षाही ते वाईट असल्याचे वक्तव्य मौलाना जोहर यांनी केले.
दरम्यान हमास आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात काही दिवसांपूर्वी हमास प्रमुख इस्माईल हनियाचा मृत्यू झाला होता, त्याबाबत मौलाना वक्तव्य करत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ काही दिवसांआधीचा असल्याचा अंदाज आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांना काँग्रेस समर्थक मानले जाते. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर आवाज उठवल्याबद्दल त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले.
मात्र आता त्यांनी वक्तव्य केलेल्या एका व्हिडिओमुळे समाजात फूट पा़डण्याचे काम केले जात आहे. दरम्यान त्यांनी काही दिवसांआधी गांधी आणि नेहरूंनीच देशाची फाळणी केली आहे.
तर आता त्यांनी काल मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, मनोज जरांगे हे अधुनिक भारतातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना अझाद आहेत, असे त्यांनी वक्तव्य केले होते. एवढेच नाहीतर त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओत हमास दहशतवादी असेल तर महात्मा गांधी, शुभाषचंद्र बोसही दहशतवादी आहेत, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.
सज्जद नेमानी यांनी काही दिवसांआधी हिंदूंविरोधात गरळ ओकली होती. अनेक मुस्लिम युवती या हिंदूंसोबत गेल्या आणि धर्मांतरण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी हिंदूंधर्माविरोधात आरोप व्यक्त केला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी मनोज जरांगे पाटील हे अधुनिक काळातील असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. यामुळे काही विशिष्ट समाजात तेढ निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांनी सज्जद नोमानी यांची भेट घेत मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी बोलत असताना मनोज जरांगे हे अधुनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद असे बेजबाबदार वक्तव्य करत मुस्लिम मौलानांनी गरळ ओकली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे अमिष दाखवत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी कट्टरपंथींशी हातमिळवणी केली आहे. एका बाजूचा विचार केल्यास सज्जद नोमानी यांनी हिंदूंविरोधात अनेकदा गरळ ओकली आहे. आता मतांसाठी मनोज जरांगे हे कट्टरपंथींच्या मांडीला मांडीला लावून बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन-उपोषण केलं. मात्र आता सज्जद नोमानी यांच्याशी हातमिळवणी करत हिंदूंमध्ये फूट पडल्याची चिंता निर्माण झाली आहे.