मोहम्मद पैगंबर यांचे वंशज म्हणवून घेणारा हाशिम सैफिद्दीन ठार
04-Oct-2024
Total Views |
बेरूत : इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाहला ठार मारल्यानंतर हिजबुल्लाहचा नेता हाशिम सैफिद्दीन यालाही ठार मारण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हाशिम सैफिद्दीन हा स्वत:ला मोहम्मद पैगंबर यांचा वंशज म्हणवून घेतो, अशी माहिती आहे. याप्रकरणाबाबत इस्त्रायल प्रसारमाध्यमाने माहिती दिली आहे.
याप्रकरणात आता इस्त्रायलच्या काही प्रसारमाध्यमाने सांगितले की, शुक्रवारी ४ ऑक्टोंबर रोजी इस्त्रायलच्या वायुसेनेच्या तीन विमानांनी बेरूत येथील एका ठिकाणी जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सैफिद्दीन मारला गेला. नसराल्लाहला ठार केल्यानंतर हिजबुल्लाहचा प्रमुख म्हणून सैफिद्दीनच्या नावाची वर्णी लावण्यात आली होती. मात्र आता इस्त्रायलने हाशिम सैफिद्दीनला ठार माल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. यामुळे हिजबुल्लाह पुरता हतबल झाला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
हाशिम सैफिद्दीन कोण होता?
हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह हा शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले. यासोबत हिजबुल्लाहचे आणखी एक कमांडर मारले गेले. यानंतर आता या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावेळी हाशिम सैफिद्दीनचे नाव चर्चेत आले.
यानंतर आता सैफिद्दीन हा हिजबुल्लाहचा नवा प्रमुख मानला जात होता. सैफिद्दीन हा नसराल्लाहचा चुलत भाऊ होता अशी माहिती आहे. तो हिजबुल्लाह येथील सर्वात वरिष्ठ व्यक्तीपैंकी एक आहे. लेबनॉन येथे जन्मलेली सैफिद्दीन हिजबुल्लाहच्या शुरा समितीचा सदस्य होता. ही समिती ही हिजबुल्लावर नियंत्रण ठेऊन आहे. शिवाय ते कार्यकारी समिती आणि जिहाग परिषदेचे प्रमुख होते. सैफिद्दीनचे वय वर्षे ६० होते. मात्र त्याला इस्त्रायल आणि हिजबुल्लाहच्या युद्धात मारले गेले. त्यामुळे आता एका पाठोपाठ हिजबुल्लाहचे दोन तारणहार मारले गेले आहेत. मोहम्मद पैगंबर यांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या सैफिद्दीनचा आता इस्त्रायलच्या संरक्षकाने हल्ला केला.