लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार; आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया

    14-Oct-2024
Total Views | 69
 
Sanjay Kelkar
 
मुंबई : लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. राज्य सरकारने मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला उद्योगपती रतन टाटांचे नाव! मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती
 
याबद्दल बोलताना संजय केळकर म्हणाले की, "मुंबईकडे जाणाऱ्या छोट्या आणि हलक्या वाहनांना पुर्णपणे टोलमुक्त करण्यात आले आहे. लाखों वाहनधारकांना याचा मोठा लाभ होणार आहे. गेली ९ वर्षे आम्ही सातत्याने टोलमुक्तीची मागणी करत आहोत. त्यासाठी विधिमंडळात, विधिमंडळाच्या बाहेर आंदोलने आणि उपोषण करत आलोत. आज राज्य सरकारने या वाहनधारकांना फार मोठा दिलासा दिला आहे," असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या निर्णयासाठी महायूती सरकारचे आभार मानले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121