नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उपक्रमातून सावरकर कारावास मुक्ती शताब्दीनिमित्त चंद्रशेखर साने यांच्या अथक प्रयत्नाने नाशिक येथील नाशिक रोड कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करणे हेतु सावरकर मुक्ती शताब्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी कारागृहाचे शिक्षक मेहेत्रे सर यांनी प्रास्ताविक केले व स्मारकाच्यावतीने विमलकुमार गुडीबंडे यांच्या हस्ते कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटकर व अशोक मालवाड यांचा माझी जन्मठेप हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी येथील कैद्यांना सावरकर पर्व हा माहिती पट दाखविण्यात आला. शिरीष पाठक यांनी सावरकरांवरील कविता सादर केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने मनोज कुवर, मिलिंद जोशी, मंगेश मरकड उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कारागृहाचे पोतदार गुरुजी यांचे सहकार्य लाभले.