जितेंद्र आव्हाडांना नेहमी शेण खायची सवय आहे - निरंजन डावखरे
04-Jan-2024
Total Views | 63
मुंबई : राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी दि. ३ जानेवारी रोजी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर देशभरातून साधू-मंहतांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना नेहमीच शेण खायची सवय आहे.. परंतु त्यांनी शेण खाताना दुसऱ्याच्या कामाची ही माती केली आहे.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे. आव्हाडांच्या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे का? असा सवाल ही डावखरे यांनी केलाय.
दरम्यान श्री. आचार्य पुरुषोत्तम दास म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे दुष्ट प्रवृत्तीचे नेते , भगवान श्रीरामाबद्दल त्यांनी केलेल्या विधानासाठी रामभक्त त्यांना माफ करणार नाही.जितेंद्र आव्हाड श्रीरामाचे दर्शन करा तुमची बुद्धी शुद्ध होईल, असा टोला ही महाराजांनी लगावला.