"संजय राऊत, आर्थर रोड जेलमध्ये खिचडी घेऊन जाऊ नका!"

नितेश राणेंचा टोला

    30-Jan-2024
Total Views |

Raut


मुंबई :
संजय राऊतांना लवकरच आर्थर रोड जेलमध्ये संदीप राऊत यांच्यासाठी डबा घेऊन जावं लागेल, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरु आहे. यावरून नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "आज भांडुपचा राजाबाबू भरपूर थयथयाट करत होता. ही खिचडी आम्हाला पचणार नाही हे खिचडी खाताना कळलं नाही का? त्यावेळी खिचडीचे पैसे स्वत:च्या मुलीच्या आणि भावाच्या अकाऊंटमध्ये टाकल्यानंतर आता लवकरच संदीप राजाराम राऊत यांच्यासाठी डबा घेऊन आर्थर रोड जेलमध्ये जावं लागेल. तिकडे फक्त खिचडी घेऊन जाऊ नका म्हणजे झालं," असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. त्यामुळे कितीही थयथयाट केला तरी लवकरच तुम्ही, तुमचा भाऊ आणि कुटुंबीय आर्थर रोड जेलमध्ये खडी फोडताना दिसणार आहात," असेही ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "सागर बंगल्यात माझा बॉस बसतो हे माझं वाक्य संजय राऊतांना झोंबलं आहे. पण मी अभिमानाने सांगतो की, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे आमचे बॉसच आहेत. मात्र, तुमचा खरा बॉस कोण हे एकदाच महाराष्ट्राला सांगा. उद्धव ठाकरे, शरद पवार की, १० जनपथ ची मम्मी तुमचा नवीन बॉस झाली आहे, हे नक्की करा. आमचा एकच बॉस आहे, हे आम्ही ठणकावून सांगू शकतो. पण तुम्ही ते सांगू शकत नाही," असेही ते म्हणाले.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121