पुणे : चार्टड अकाऊंटंट केतन जोगळेकर यांची "ब्रिज बिझनेस चेंबर्स इंडस्ट्री फेडरेशन" या इंडो- आफ्रिका कौंसिलवर नुकतीच "नॅशनल एक्झुक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट फॉर इंडो-आफ्रिका इंन्व्हेस्टमेंट कौंसिल" म्हणुन नेमणुक झाली आहे. ते पुणे येथील रहिवासी असून प्रथितयश चार्टर्ड अकाऊंटंट आणि मॅनेजमेंटमध्ये डॅाक्टरेट झाले आहेत.
"ब्रिज बिझनेस चेंबर्स इंडस्ट्री फेडरेशन" हे भारत आणि आफ्रिकेतील सर्व बिझिनेस चेंबर्स सोबत विविध व्यावसायिक आणि कौंसिल्सना विविध विषयांवर आणि विविध व्यवसायांबाबतीत एक व्यापक व्यासपिठ निर्माण करुन देते. या कौंसिलच्या अंतर्गत अनेक मान्यवर व्यावसायिक , ॲडवायझर, गव्हर्नमेंट कन्सल्टंट आणि काही पॅालिसी मेकर्सच्या माध्यमातुन व्यवसायवृद्धी, कल्चर ह्या विषयात काम करत आहेत.