नितेश तिवारींच्या रामायणात 'ही' अभिनेत्री साकारणार शुर्पणखेची भूमिका
17-Jan-2024
Total Views | 38
मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांची मोठी फौज दिसणार आहे. पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दलही माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री कुब्रा सैत ही रामायण चित्रपटात शुर्पनखेची भूमिका साकारेल अशी माहिती समोर येत आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नाही. रामायणात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत तर लारा दत्ता राजा दशरथची तिसरी पत्नी कैकेयीची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या सगळ्यासाठी निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.