मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर शीगेला पोहोचलेल्या मालदीव-लक्षद्वीप मधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मालदीवला सुनावल्यानंतर आता यात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून यांनीही आता थेट मालदीवला सुनावले आहे. नागार्जुनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेत पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नसल्याचे सुनावले आहे. दरम्यान, तेलुगू अभिनेता नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलून लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे.
नागार्जुन म्हणाला की,"१७ जानेवारी २०२४ रोजी सुट्टीसाठी मी मालदीवला जाणार होतो. कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी मालदीवला जाणार होतो. 'बिग बॉस' आणि 'ना सामी रंग'नंतर आता मी मालदीवला सुट्टीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे". तसेच, त्याने 'बॉयकॉट मालदीव' असेही हॅशटॅग वापरले असून मालदीवचा वाद सुरू नसताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. पण आता नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करुन दिली असल्याचेही त्याने म्हटले.