भारतात दर ४ मिनिटाला मेंदू विकारामुळे एका नागरिकाचा मृत्यू!

    16-Jan-2024
Total Views | 79

Brain Stroke


मुंबई :
जागतिक आकडेवारीनुसार ब्रेन स्ट्रोक या आजारामुळे मृत्यूंची संख्या वाढत असून कायमस्वरूपी अपंगत्व येणे ही एक मोठी समस्या समाजासमोर उभी राहिली आहे, त्यामुळे याविषयी अधिक माहिती घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण असून भारतात दरवर्षी सुमारे २ लाखाहून अधिक नागरिकांना ब्रेन स्ट्रोक होतात म्हणजेच दर ४० सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होत असून आणि दर ४ मिनिटांनी स्ट्रोकमुळे एका नागरिकाचा मृत्यू होत आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिजिजेसच्या २०१० च्या आकडेवारीनुसार १०० पैके ३१ रुग्ण हे २० वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत तसेच भारतामध्ये कमी वयात ब्रेनस्ट्रोक येण्याचे प्रमाण हे वाढत आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या आकडेवारीनुसार ब्रेनस्ट्रोकमुळे २०१९ मध्ये भारतात सहा लाख नव्याणव हजार मृत्यू झाले, जे एकूण मृत्यूच्या ७.४ % होते.
 
याविषयी अधिक माहिती देताना ठाणे येथिल सोलारीस हॉस्पिटलचे संचालक व मेंदूविकार तज्ञ व शल्यचिकित्सक डॉ अमित ऐवळे म्हणाले," स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक्सच्या स्वरूपात चरबी जमा होते. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो अथवा पूर्णपणे बंद होतो. या गुठळ्या रक्तातील ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह रोखते ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मृत पावतात. स्ट्रोक मध्ये दोन प्रकार असून पहिला प्रकार हा सौम्य स्ट्रोक तर दुसऱ्या प्रकाराला स्ट्रोक असे संबोधले जाते. पहिल्या प्रकारात रक्तप्रवाह काही वेळासाठी थांबतो त्यामुळे मेंदूवर कायमस्वरूपी प्रभाव पडत नाही परंतु त्याची लक्षणे इतर स्ट्रोक सारखीच असतात आणि अनेकदा येऊ घातलेल्या मोठ्या स्ट्रोकची ती पहिली पायरी असते त्यामुळे लगेचच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तर दुसऱ्या प्रकारात मेंदूला कायमचे नुदोन ते तीन दिवसांनी उपचार सुरु करतात, यामुळे अनेक रुग्णांना कायमचे अपंगत्व येते व त्याचा त्रास त्या रुकसान होऊ शकते आणि दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. म्हणून, स्ट्रोकच्या सर्व लक्षणांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे वेळ ना दवडता मेंदुविकार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अनेकवेळा स्ट्रोक आल्यानंतर १५-१६ तासांनी रुग्ण डॉक्टरकडे पोहचतो कधीकधी तर ग्णाच्या नातेवाईकांना सोसायला लागतो यामुळे अनेक रुग्ण हताश होऊन आत्महत्या करतात."
 
मेंदूला हानी झाल्याची लक्षणे म्हणजे वारंवार चक्कर येणे, शरीराचे असंतुलन आणि समन्वय कमी होणे, चालणे, बसणे, हालचाल करणे कठीण होणे तसेच अचानक आंशिक किंवा पूर्ण दृष्टी कमी होणे हि स्ट्रोकची ठळक लक्षणे आहेत.
 
स्ट्रोक टाळण्यासाठी उपाय काय?
 
दारू व तंबाखूचे सेवन टाळा
नियमित व्यायाम करा
आहार संतुलित ठेवा.
सॅच्युरेटेड फॅट, मीठ, ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ टाळा.
भरपूर फळे व भाज्यांचा आहारात समावेश करा.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121