राम मंदिरात नेत होते काँग्रेसी झेंडा! रामभक्तांनी दाखवला हिसका
15-Jan-2024
Total Views | 492
लखनौ : अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या समर्थकांमध्ये आणि भाविकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अजय राय यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शनाला जाताना काँग्रेस पक्षाचा झेंडा घेवून गेले होते. त्यावरुन दोन्ही गटात शाब्दीक बाचाबाची झाली, याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.
मंदिरात झेंडा फडकावणे हे या वादामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा झेंडा फडकावत मंदिर परिसरात दाखल झाले होते. भाविकांनी ध्वज न लावण्याचे आवाहन केल्याने काँग्रेस नेत्यांनी भाविकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि अन्य काँग्रेस नेते सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय आहे. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या हायकमांडने दि. २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे.