"रवींद्र वायकरांनी खरेदी केली ३ कोटींची जमीन फक्त ३ लाखांत!"
किरीट सोमय्यांचा खुलासा
15-Jan-2024
Total Views | 308
मुंबई : काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड होती. रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, आता किरीट सोमय्यांनी याप्रकरणी पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.
Ravindra Waikar got Jogeshwari Hotel Land/Plot of ₹3.93 Crores Market Value Land at ₹3 lac only (just at 1%)
Hisab to Dena Padega
रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी हॉटेल भूखंड ₹3.93 कोटी मार्केट व्हॅल्यूची जमीन फक्त ₹3 लाखात (फक्त 1%) मिळाली
रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी येथील ३.९३ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३ लाख रुपयांमध्ये मिळाली असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे रवींद्र वायकरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी ९ जानेवारी रोजी रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली होती.