बिहारमध्ये अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या; आरोपी मोहम्मद आणि नजीर अटकेत

    14-Jan-2024
Total Views | 47
 bihar
 
पाटणा : बिहारमधील पूर्णियामध्ये पोलिसांनी १५ वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले असून, त्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या मोहम्मद तय्यब आणि नजीर खान याला अटक केली आहे. या दोघांनी अल्पवयीन मुलीचा गळा चिरून मृतदेह झाडाला लटकवला होता. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येतील आरोपी मोहम्मद तय्यबचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
 
पूर्णियामध्ये एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. कुटुंबीयांनी हत्येचा संशय असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासात ही तरुणी तय्यब नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून तय्यबचे ठिकाण पूर्णिया येथे असल्याचे निष्पन्न झाले, तर तो दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले. ही घटना पूर्णियाच्या अमूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. १५ वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. कुटुंबीयांनी हत्येची भीती व्यक्त केली होती. आता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी मोहम्मद तय्यब आणि नजीर खान यांना दिल्लीतून अटक केली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तय्यब आपल्या मित्रासोबत २७ डिसेंबरला दिल्लीहून पूर्णियाला आला होता. त्याने मुलीला रात्री शेतात भेटायला बोलावले. तेथे त्याने मुलीची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला. दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला परत आले. लोकांना त्याच्या उपस्थितीची जाणीवही नव्हती.
 
मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी आत्महत्येचा आरोप फेटाळून लावला असून पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी त्याच गावातील मोहम्मद तय्यबवर आरोप केले आहेत. तक्रारीच्या आधारे तय्यबचे मोबाईल लोकेशन तपासले असता त्याचे लोकेशन पूर्णिया येथील असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तय्यब आणि नजीरला अटक करून चौकशी केली, तेव्हाच खुनाचा उलगडा झाला.
 
पोलिसांनी केलेल्या चौकशीत तय्यबने सांगितले की, अल्पवयीन मुलगी त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. अशा स्थितीत त्याला वाटेवरून हटवण्याची संपूर्ण योजना आखून त्याचा खून केला. मुलीवर बलात्कार झाला की नाही याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121