मालदीवपेक्षा लक्षद्विपच बरं! पंकज त्रिपाठींचा भारत पर्यटनाला पाठिंबा
11-Jan-2024
Total Views | 27
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा करत तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ माजला. सोशल मिडियावर बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रॅन्ड होऊ लागला. शिवाय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पंतप्रधान आणि लक्षद्वीपला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट केल्या. आता यात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही आपले मत मांडले असून मालदीवपेक्षा लक्षद्वीप बरं असे म्हणत भारतीयांचे मन जिंकले आहे.
पंकज त्रिपाठी यांना त्यांच्या सुट्टीच्या नियोजनाबाबत न्यूज १८ या वाहिनीनीने प्रश्न विचारला असता, 'मी मालदीवला का जाऊ, त्यापेक्षा लक्षद्वीपला जाईन', असे उत्तर पंकज यांनी दिले. ते म्हणाले, “भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी मी नेहमीच बोलत असतो. मी नेहमीच माझ्या मुलांना भारतात पर्यटन करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो”.
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असून या सोहळ्याला अनेक कलाकार मंडळी हजर राहणार आहेत. मात्र, पंकज त्रिपाठी इतक्यात राम मंदिरास भेट देण्यास जाणार नसून काही दिवसांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी पत्नी आणि मुलीसोबत अयोध्येला जाणार असल्याचे पंकज यांनी सांगितले.
रामालल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, सनी देओल, प्रभास आणि यश यांच्यासह अनेक कलाकारांना या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.