विरोधकांच्या अशा प्रतिक्रियांचे आश्चर्य वाटत नाही; आमदार अपात्रता निकालावर फडणवीस काय म्हणाले ? वाचा सविस्तर
11-Jan-2024
Total Views | 52
छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच १० जानेवारीला लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ११ जानेवारी ला गंगापुर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपुजन सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल मत मांडल आहे. काल लागलेल्या निकालावर आनंद व्यक्त करतो. आणि कोणालाही आता शंका असण्याचे कारण नाही की हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अस ते यावेळी म्हणाले.
उबाठा गटाकडून करण्यात आलेल्य़ा टिकेला उत्तर देताना ते म्हणाले " ज्यांनी कायदा कळत नाही आणि ज्यांनी कायदा कधी पाळला नाही अशे लोक या निर्णयावर बोलत आहेत". हे लोक निकाल आपल्या बाजुने लागला नाही तर सुप्रिम कोर्टांवरही आरोप करतात. त्यामुळे त्यांच्या अशा प्रतिक्रियांचे आश्चर्य वाटत नाही."
आमदार अपात्रतेवर बोलताना "तांत्रिक बाबिंमुळे कोणालाही अपात्र कारता येणार नाही अस अध्यक्ष म्हणाले याचा अर्थ उबाठा गटाला पक्ष म्हणुन मान्यता असा होत नाही मुळ शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे अस ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ज्या मुद्द्यांवर निर्णय देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अगदी योग्य पद्धतीने अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला निकाल कायद्याला धरुन आहे असही पुढे म्हणाले.