२२ जानेवारीला राज्य सरकारकडुन शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा; चित्रा वाघ यांनी मानले सरकारचे आभार

    11-Jan-2024
Total Views | 46
chitra wagh
 
मुंबई : राज्यातील आपलं महायुतीचं सरकार किती संवेदनशील आणि मायबाप जनतेच्या आनंदाचा-गरजेचा विचार करणारं आहे, हे आपल्या निर्णयांमधून आणि कामांमधून सरकार वेळोवेळी दाखवत आलं आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमधून पुन्हा एकदा आपल्या महायुती सरकारचा सर्वसामान्यांप्रतीचा हा भाव दिसून आलाय. अस मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केल आहे.
 
 
 
"प्रत्येक सणावाराला आपलं हे सरकार आपला सण गोड आणि आनंदाचा व्हावा यासाठी आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना देत असते. ही प्रथा कायम ठेवत राज्य सरकारने २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी असलेल्या जयंती निमित्ताने. अशा दोन पवित्र दिवसांचे औचित्य साधून हा आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला आहे". अस म्हणत त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्यातील मातृशक्ती च्या वतीने आभार मानले आहेत.
 
"कुपोषणासारख्या राज्यातील अतिमहत्त्वाच्या समस्येवर अधिक प्रभावीपणे मार्ग काढ़ता यावा यासाठीही राज्य सरकारने या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील नागरी भागातील, जिथे कुपोषणाचं प्रमाण सर्वाधिक आहे, येथील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी खास नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या बाल विकास केंद्रांतर्गत कुपोषण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. कुपोषित बालकांच्या आहारप्रणालीत सुदृढता आणत हळूहळू कुपोषण संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं, विरोधकांनी कितीही कुरघोड्या केल्या, बिनबुडाचे आरोप केले तरीही स्वच्छ नितीने जनतेच्या हितासाठी काम करणारे आपल सरकार आहे." असही त्या पुढे म्हणाल्या.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121