मुंबई : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता - सिव्हिल हे रिक्त पद भरले जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून 'प्रकल्प अभियंता - सिव्हिल' पदाच्या एकूण २० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे.
एमआरव्हीसीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेसाठी दि. २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२३ रोजी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच, उमेदवाराचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. सदर भरतीद्वारे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने नियुक्त केले जाईल. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एमआरव्हीसीच्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम आणि गुण वितरण आणि मुंबई रेल्वे संबंधी इतर सर्व आवश्यक माहिती विचारली जाईल. त्याचबरोबर अर्ज करण्याची पध्दत ही ऑफलाईन असून मुलाखतीचे ठिकाण व्यवस्थापक (एचआर), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-४०००२०.