ईद जुलूसमध्ये महिलांसोबत छेडछाड; हिंदूत्ववादी संघटना आक्रमक
30-Sep-2023
Total Views | 430
मुंबई : यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले. परंतु मुस्लिम समाजबांधवांनी अनंत चतुर्दशीमुळे त्यांचा सण हा गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (२९ ऑक्टो.) साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील विविध भागात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने जुलूस निघाले होते. असाच एक जुलूस विक्रोळी पश्चिम येथील पार्कसाईट भागात पार पडला. मात्र, या जुलूसमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे विक्रोळीतील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.
जुलूसमधील काही तरुणांकडुन तरुणींची छेड काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु या घटनेला २६तास उलटून देखील पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे हिंदुत्वावादी संघटना या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. सकाळपासून संघटनांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच, जो पर्यंत या घटनेतील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, या घटनेतील ३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर, या घटनेच्या निषेधार्थ विक्रोळी बंद ठेवण्याचे देखील आवाहन करण्यात आले होते. रिक्षा चालकांनी, दुकानदारांनी बंद ठेवत या घटनेचा निषेध करावा, असे आवाहनही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आले होते. सर्वांनी एकजुट होऊन जो निषेध नोंदवला त्याप्रति पोलिस उपायुक्त (DCP) यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कारवाई करण्याचे अश्वासन दिले आहे. आणि जोपर्यंत आपल्या ताईला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि निषेध असेच चालु राहील, असेही संघटनांकडुन सांगण्यात येत आहे.