वडेट्टीवारांनी सत्य माहिती घेऊनच आरोप करावे: अंबादास दानवे

    30-Sep-2023
Total Views | 41
 
Ambadas Danve
 
 
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असून असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
 
"शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. शिवसैनिक म्हणूनच मी राज्यभर फिरतो. मी कोणत्याही जातीचा नेता नसून आतापर्यंत कसल्याही आरक्षित जागेचा मी लाभ घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या गटातून मी निवडून आलेलो आहे."
 
"विजय वडेट्टीवार यांनी व्यक्तिश: माझ्यावर केलेले आरोप पूर्णत: खोटे असून त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी याचे पुरावे सादर करून सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी. जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल. तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन असे आरोप करावे." असं दानवे यांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121