भारताकडून ऑस्करसाठी यावर्षी '२०१८' या मल्याळम चित्रपटाची निवड

    27-Sep-2023
Total Views | 63

2018 movie oscar 
 
मुंबई : एमी पुरस्काराच्या नामांकन यादीत भारतीय कलाकारांनी बाजी मारल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेता टोविनो थॉमसच्या ‘२०१८ एव्हरीवन इज ए हीरो’ या चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जूड अँथनी जोसेफ याने केले आहे. हा चित्रपट मल्याळम हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता.
 
‘२०१८ एव्हरीवन इन ए हीरो’ या चित्रपटाचे कथानक २०१८ साली केरळमध्ये आलेल्या पुरस्थितीवर आधारित असून त्यावेळी या नैसर्गिक आपत्तीला नागरिकांनी कसे तोंड दिले याची सत्य कथा यात मांडण्यात आली आहे. टोविनो थॉमससोबतच चित्रपटात कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. सध्या या चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
 
 
 
दरम्यान, २०२२ रोजी ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेशासाठी निवड झाली होती. तसेच, 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या डॉक्युमेंट्रीने आणि आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर पुरस्कारावर भारताचे यशस्वी नाव कोरले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121