उदयनिधी स्टॅलिनवर भाजपच्या श्रीकांत भारतीय यांचा हल्लाबोल!
22-Sep-2023
Total Views | 36
मुंबई : नवीन संसद भवनात प्रवेशाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी उपस्थित होते, मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभात दिसल्या नाहीत. आता उदयनिधी स्टॅलिन यांनी या प्रकरणावर पुन्हा एकदा सनातन धर्मावर भाष्य केले आहे. स्टालिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी आधी निमंत्रित केले नव्हते आणि आताही नाही कारण त्या विधवा आणि आदिवासी समुदायातून आहेत. आणि यालाच आपण सनातन धर्म म्हणतो, असे विधान स्टॅलिन यांनी केले.
त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते श्रीकांत भारतीय म्हणाले की, उदयनिधींनी केलेले वक्तय म्हणजे विकृत मानसिकता आहे. अशाप्रकारे देशाच्या राष्ट्रपतींवर आक्षेपार्ह विधान करणे चुकीचे आहे. अशा पद्दधतीने जाहिर रित्या एका महिलेबद्दल असे बोलणे ही देशातील १४० कोटी जनतेचा अपमान आहे. त्यामुळे उदयनिधींनी देशाची आणि महिलांची माफी मागितली पाहिजे, असा उदयनिधी स्टॅलिनवर भाजपच्या श्रीकांत भारतीयंचा हल्लाबोल केला. दरम्यान भाजप २०२४ ची लोकसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढणार असल्याचे ही भारतीय यांनी सांगितले.