चीनच्या मुद्द्यावर चर्चेस तयार; राजनाथ सिंह यांचे काँग्रेसला खुले आव्हान
21-Sep-2023
Total Views | 32
नवी दिल्ली : आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चांद्रयान-३ आणि आदित्य एल१ मिशनवर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी राजनाथ सिंह यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होते.
राजनाथ सिंह सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत असताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना थांबवले आणि चीनवर चर्चा करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न केला. यावर राजनाथ सिंह म्हणाले की, "हो माझ्यात हिम्मत आहे. पूर्ण धैर्य आहे."
त्यावेळी अधीर रंजन चौधरी उभे राहिले आणि म्हणाले की, "चीनने आमच्या सीमेचा किती भाग व्यापला आहे? यावर राजनाथ सिंह यांनी अधीर रंजन चौधरींना चांगलेच प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले की, अधीर रंजन जी, इतिहासात जाऊ नका. मी चर्चा करण्यास तयार आहे आणि मी छाती ठोकपणे यावर चर्चा करु शकतो."