शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
31-Aug-2023
Total Views | 56
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांची भूरळ पाडत आहेच. 'पठाण'नंतर पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शाहरुख सज्ज झाला आहे. शाहरुखच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून किंग खानने स्वतः 'जवान'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून शाहरुखसह यामध्ये सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पादुकोण देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील दिसत असून अभिनेत्री गिरीजा ओक यात महत्वपुर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
जवान या चित्रपटाचे कथानक थोडक्यात सांगायचे झाल्यास, देशाला वाचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या एका 'जवान'ची आहे. काली (विजय सेतुपती) या व्यापार्यापासून देशाला वाचवण्याची वेळ या जवानावर येते. आणि मग तो जवान अर्थात शाहरुख कसं देशाला वाचवतो हे यात पाहायला मिळणार आहे, महत्वाची बाब म्हणजे याच शाहरुख दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, जवान देशभरात ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.