तब्बल चार महिन्यांचा असेल आदित्य एल-१ चा प्रवास, वाचा सविस्तर..
31-Aug-2023
Total Views | 58
मुंबई : काही दिवसांपूर्वीच चंद्राच्या दक्षिण धृवावर चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण पार पडले. त्यानंतर आता प्रथमच आदित्य एल-१ ही सौर मोहिम हाती घेण्यात आली आहे. येत्या २ सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
पृथ्वी आणि सुर्याच्या मध्ये असलेल्या एल-१ म्हणजेच लांग्रेज पॉईंटवर आदित्य एल-१ चे प्रक्षेपण होणार आहे. हे अंतर सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटरचे असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सुर्याचे तापमान, वेग, घनता, क्रोमोस्फियर आणि कोरोना गतिशीलतेचा अभ्यास करणे, प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करणे, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सगळ्याचा अभ्यास करणे हे आदित्य एल-१ मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आदित्य एल-१ पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ठेवण्यात येईल. त्यानंतर या कक्षेला लंबवर्तुळाकार बनवून नंतर ऑन-बोर्ड प्रोपल्शन वापरून लांग्रेंज पॉइंट एल-१ च्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल
एल-१ च्या दिशेने प्रवास करत असताना आदित्य एल-१ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर पडेल. त्यानंतर त्याची क्रुझ फेज सुरु होईल आणि हे यान एल-१ भोवती एका मोठ्या प्रभामंडल कक्षेत (Halo Orbit) ठेवले जाईल. या संपुर्ण प्रक्रियेसाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल.