कागद दाखवा, अथवा दावा सोडा....केंद्र सरकारची दिल्ली वक्फ मंडळास नोटीस

दिल्लीतील जामा मशिदीसह १२३ वक्फ संपत्ती होणार सरकारजमा

    30-Aug-2023
Total Views | 890
Central Government Noticed To Delhi Waqf Board

नवी दिल्ली :
नवी दिल्लीतील जामा मशिदीसह दिल्ली वक्फ मंडळाच्या ताब्यात असलेल्या १२३ वक्फ संपत्ती या सरकारजमा होणार आहेत. केंद्रीय शहरविकास मंत्रालयाने तशी नोटीस दिल्ली वक्फ मंडळास पाठविली आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने वक्फ मंडळाच्या १२३ मालमत्ता परत घेण्याची नोटीस बजावली आहे. ज्या मालमत्ता परत घेतल्या जाणार आहेत, त्यामध्ये नवी दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीचा समावेश आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. ही जामा मशिद पुरानी दिल्ली परिसरातील ऐतिहासिक जामा मशिद नसून मध्य दिल्ली येथे जुन्या संसद भवनाजवळ असलेली जामा मशिद आहे.

केंद्र सरकारने बजाविलेल्या नोटीशीतील १२३ ठिकाणांमध्ये मशिदी, दर्गा आणि कब्रस्तान यांचा समावेश आहे. या वास्तू ज्या जमिनीवर आहेत, त्यांची मालकी एकेकाळी केंद्र सरकारकडे होती. मात्र, मनमोहन सिंग सरकारच्या काळात या मालमत्ता वक्फ बोर्डाला देण्यात आल्या होत्या. यापूर्वी केंद्र सरकारने दिल्ली वक्फ मंडळास या जमिनींची मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ती कागदपत्रे दाखवण्यास वक्फ मंडळास अपयश आले होते. त्यानंतर वक्फ मंडळाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला होता.

दिल्ली आणि नवी दिल्लीमधील या मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि समुदाय कल्याणासाठी त्यांचा वापर सुलभ करणे यासाठी सरकारने या मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121