पुणे : ज्यांच्या गाड्या सीएनजीच्या आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरातील सीएनजीची विक्री बंद असणार आहे. यामुळे आताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहे. पुणे शहरातील पंप चालकांनी 10 ऑगस्टपासून टोरेंट सीएनजी पंपांवर CNGची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना ट्रेड मार्जिनची मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे येथील पेट्रोल डीलर्स अससोसिएशन तेल कंपन्या आणि टोरेंट गॅस यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा थकबाकी मिळाली नाही. त्यामुळेचं बंद ची हाक देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सीएनजी विक्री करणारे एकूण 42 विक्रेते आहेत. त्यांनी १० ऑगस्टपासून विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या खात्यात ट्रेड मार्जिनची रक्कम रिफ्लेक्ट होईपर्यंत CNG ची विक्री थांबविण्याचा पुणे जिल्हा असोसिएशनने घेतला आहे. यामुळे १० ऑगस्टनंतर पंपावर सीएनजी मिळणार नाही.