भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने केला राष्ट्रध्वजाचा सन्मान, तिरंग्याऐवजी टी-शर्टवर दिला ऑटोग्राफ

    28-Aug-2023
Total Views | 79
Neeraj Chopra News

नवी दिल्ली
: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या दरम्यान त्याने हे सिद्ध केले की एक महान खेळाडू असण्यासोबतच तो एक महान माणूस देखील आहे. वास्तविक, एक महिला नीरज चोप्रा यांच्याकडे तिरंग्यावर ऑटोग्राफ मागण्यासाठी आली होती. पण तिरंग्याऐवजी त्यांने तिरंग्याचा मान राखत. टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर पाकिस्तानी अॅथलीट अरशद नदीम ध्वजविना मैदानात दिसला. अशा स्थितीत नीरजने त्याला भारतीय झेंड्याखाली बोलावले.

क्रीडा पत्रकार जोनाथन सेल्वाराजने नीरज चोप्राचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले, “एका हंगेरियन महिलेला नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. तिला नक्कीच ऑटोग्राफ देणार असल्याचे नीरजने सांगितले. पण, महिलेला तिरंग्यावर ऑटोग्राफ हवा असल्याचे तिने नीरजला सांगितले. यावर नीरज म्हणाला की, मी तिरंग्यावर सही करू शकत नाही. यानंतर त्याने त्या महिलेच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. यामुळे महिला आनंदी दिसत होती.
 
त्याचवेळी नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आहे. या सामन्यात नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी पाकिस्तानी अॅथलीट अरशद नदीमने रौप्य आणि चेक प्रजासत्ताकच्या जेकोब वडलेजिकने कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्रा आणि जेकब वडलेजिक यांच्याकडे आपापल्या देशांचे झेंडे होते. पण अरशद नदीमकडे पाकिस्तानचा झेंडा नव्हता. म्हणून तो काही अंतरावर उभा राहिला.यादरम्यान जेव्हा नीरज चोप्राची नजर अरशद नदीमवर पडली तेव्हा त्याने त्याला आपल्याजवळ बोलावले. यानंतर नीरज आणि अरशद नदीम भारतीय झेंड्याखाली दिसले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नीरज चोप्राचे जोरदार कौतुक होत आहे.
 
महान भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. मात्र, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राची सुरुवात चांगली झाली नाही. नीरज पहिल्याच प्रयत्नात १२व्या क्रमांकावर होता. कारण नीरज चोप्राचा थ्रो अवैध ठरला होता. पण यानंतर नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात अप्रतिम पुनरागमन केले आणि ८८.१७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.



अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121