गगनयानातून अंतराळात जाणार भारताची महिला रोबोट 'व्योममित्र' !
28-Aug-2023
Total Views | 51
नवी दिल्ली : इस्त्रोने आता 'गगनयान' मोहिमेची तयारी सुरू केली आहे. इस्त्रोची ही पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेद्वारे अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. पंरतू याआधी इस्त्रोकडून मोहिमेची चाचणी होईल. इस्त्रो लवकरच गगनयानचे ट्रायल मिशन लाँच करणार आहे. ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवले जाईत, असे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, गगनयान मोहिमेअंतर्गत महिला रोबोट 'व्योम मित्र' अंतराळात पाठवण्यात येत आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'आम्ही ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी मोहीम सुरू करणार आहोत. ते म्हणाले, 'आम्ही व्योमित्रला आणखी एका मोहिमेद्वारे अवकाशात पाठवू.' अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणे आणि त्यांना सुरक्षितपणे आणणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.