"छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य भोसल्यांचं नव्हतं...." : शरद पवार
25-Aug-2023
Total Views | 653
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची आज दि. २५ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात निर्धार सभा सुरू आहे. यावेळी दसरा चौकात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य भोसल्यांचं नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं, असे विधान शरद पवारांनी केली.तसेच करवीर नगरी देशाला दिशा दाखवणारी नगरी आहे. मला जन्म देणारी माता कोल्हापूरची होती, असे अत्यंत भावनिक भाषण पवारंनी केली.
दरम्यान ढोंगी विचारांना शाहू महाराजांनी जागा दाखवली.शाहू महाराज यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही,असे ही पवार म्हणाले. तसेच लोक महागाई, बेरोजगाराने ग्रासलेले आहेत. पण मी कृषी मंत्री असताना, मी कधी कांद्यावर कर लावला नाही, असे विधान पवारांनी केली.