मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना २९ ऑग. अटकेपासुन दिलासा मिळाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.