नवी मुंबई :उल्हासनगर येथील रिजन्सी अँटिलिया गृहसंकुलात आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी २ किलोमीटर लांबीच्या तिरंगा ध्वजची रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन दिव्यांगांच्या हस्ते करण्यात आले, उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार ऐलानी, उद्योगपती महेश अग्रवाल तसेच शहरातील सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.
रिजन्सी अँटिलिया गृहसंकुल, सामाजिक कार्यकर्ते आशिष यादव, उल्हास नदी बचाओ कृती समिती, उल्हासनगर अंध संघटना, महामाया असंघटित महिला कामगार संघटना, उल्हासनगर स्मशानभूमी समिती, हिंदी भाषिक संघटना, दशमेश पिता शिख युवा संघटना, श्यामला सेवा प्रतिष्ठान, सिमरन सखी संस्था यांच्या सहकार्याने हा २ किलोमीटरचा तिरंगा बनविण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रमाचे समनव्यक शशिकांत दायमा यांनी दिली.
आज दुपारी १ वाजता रिजन्सी अँटिलिया गृहसंकुलाच्या भव्य पटांगणात, उल्हास नदीच्या काठावर मानवी साखळी बनवून ही तिरंगा ध्वजची रॅली काढण्यात आली .उपस्थित १०० पेक्षा अधिक दिव्यांग बंधूंनी या २ किलोमीटरच्या तिरंगा रॅलीचे उद्घाटन केले. उद्योगपती महेश अग्रवाल, भाजपचे आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, शिवसेना ( उबाठा ) धनंजय बोडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गंगोत्री, शिवाजी रगडे, संतोष पांडे, मोनू सिद्दीकी, काँग्रेसचे रोहित साळवे, मैनुद्दीन शेख,बंडू देशमुख व इतर अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.या अभूतपूर्व तिरंगा रॅलीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती शशिकांत दायमा यांनी दिली.