धक्कादायक! पुण्यात दहशतवाद्यांच्या घरातून ड्रोनसह बॉम्ब साहित्य जप्त

    31-Jul-2023
Total Views | 429
 
Pune Terrorism
 
 
पुणे: पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, गुगलवरून घेतलेली कुलाबा येथील छाबडा हाउससह इतर संवेदनशील स्थळांची मोबाइलमधील छायाचित्रे आणि लॅपटॉपमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केल्याची माहिती राज्य एटीएसकडून देण्यात आली आहे.
 
दरम्यान, फरार झालेल्या तिसऱ्या दहशतवाद्यापर्यंत पोचण्याचा ‘एटीएस’चा प्रयत्न सुरू आहे. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
‘एटीएस’ने या प्रकरणात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला अटक केली. त्यानंतर पठाणला आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा) याला रत्नागिरीहून शनिवारी अटक केली आहे.
 
दहशतवादी हे स्वत:ला ग्राफिक डिझायनर असल्याचे भासवीत होते. परंतु त्यांचे प्रत्यक्षात बारावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही. तरीही ते प्रशिक्षित दहशतवादी असून, त्यांनी बॉम्ब तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. ते कोंढवा परिसरात नाव बदलून राहत होते. आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांनी ड्रोनमधून घेतलेले चित्रीकरण न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. तपासात येत्या आठवडाभरात महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील, असे ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121