इस्लामिया विद्यापीठामध्ये धक्कादायक प्रकार! पास करण्याचे आमिष दाखवून 5500 मुलींचे बनवले नग्न व्हीडिओ
28-Jul-2023
Total Views |
मुंबई : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनमध्ये महिला विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये या व्हिडिओंची संख्या सुमारे ५५०० असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा अधिकारी विद्यार्थिनींना चांगल्या मार्कांचे आमिष दाखवून त्यांचे नग्न व्हिडिओ बनवत असे. सोबतच या विद्यापीठातील ११३ विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. विद्यापीठातील एक प्राध्यापक त्यांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी विद्यापीठाचे संचालक डॉ. अबुझर, सुरक्षा अधिकारी सय्यद एजाज शाह आणि अल्ताफ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांना एजाजच्या २ फोनमधून या अश्लील व्हिडिओ क्लिप मिळाल्या आहेत. पोलिसांनी २२ जुलै रोजी विद्यापीठावर छापा टाकला होता. हे संस्था आणि विद्यार्थ्यांविरोधातील षडयंत्र असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचवेळी पोलिसांचे म्हणणे आहे की, विद्यापीठ हे आमचे टार्गेट नाही, आम्हाला ड्रग्ज तस्करांना पकडायचे आहे.
विद्यापीठात डान्स आणि सेक्स पार्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि महिला कर्मचाऱ्यांसोबतही जबरदस्ती करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमधील दक्षिण पंजाबचा शिक्षण विभागही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी एजाज हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे.