भोपाळ : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणार्या इंदूरच्या ख्रिश्चन समाजाने देशातील पहिली चार मजली कबर (लेयर्ड ग्रेव) बनवली आहे. इंदूरच्या कांचनबाग येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीत अशा ६४ कबरी बनवण्यात आल्या आहेत. त्या कबरी १५ फुट खोल,साडेचार फुट रुंद आणि साडेसहा फुट लांब आहेत. यामध्ये एकूण पाच थर आहेत. त्यात सर्वात तळाशी असणारी जागा रिकामी ठेवली आहे. त्यावर एकावर एक असे चार मृतदेह पुरले जाऊ शकतात.
एवढेच नाही तर जेव्हा १०-१२ वर्षांनी जेव्हा चारही कबरी भरल्या जातील. तेव्हा त्या शवपेटीतील अवशेष तळाशी रिकाम्या जागेत भरले जातील. आणि नंतर पुन्हा वरच्या चार थरात मृतदेह पुरले जातील. तसेच या कबरीमध्ये वरची जागा मृतदेहांची नावे ठेवण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. जेव्हा ते भरेल तेव्हा तिथेच त्या दगडांपासून स्मृती भिंत बनवली जाईल.
इंदूर डायोसीजचे बिशप टीजे चाको यांच्या म्हणण्यानुसार, जागेच्या कमतरतेमुळे समाजातील लोकांशी विचारविमर्श करून हा प्रयोग करण्यात आलेला आहे. तसेच हा प्रयोग करताना समाजातील काही लोकांचा म्हणणे होते की, , पूर्वी लोक मृतदेह पुरताना त्यात माती टाकत. त्यामुळेच लोकांच्या भावना पाहता. आता या नव्या व्यवस्थेत मृतदेहाला पुरताना मातीऐवजी फुले टाकली जाणार आहेत. तसेच आधुनिक परिस्थिती पाहता यात कोणताही विरोधाभास नाही, असेही चाको म्हणाले.