मुंबई : काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाला सोडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेनेत सामील झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना पक्षातंरबंदी कायद्या अंतर्गत अपात्र ठरवण्याची मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी केली होती. यावर आता विधानपरिषदेचे तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी निकाल दिला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे कायम राहणार, त्यांनी पक्षांतर केले असं म्हणता येणार नाही. अशी तरतूद किंवा नियम आढळून येत नाही. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संविधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधीत राहतील, असा निकाल तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला.
तालिका सभापती निरंजन डावखरे यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णायामुळे आणखी काही आमदार शिवसेनेत सहभागी होऊ शकतात. मागच्या काही दिवसात ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.