अंतर्मनाची साद ऐकून सिल्व्हर ओक वर गेलो: अजित पवार

    15-Jul-2023
Total Views |
 
Ajit Pawar
 
 
मुंबई : अंतर्मनाची साद ऐकून सिल्व्हर ओकवर गेलो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दि. १५ जुलै रोजी अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना दुखापत झाल्यानं त्यांची विचारपूस करण्यासाठी अजितदादांनी ही भेट घेतली.
 
अजित पवार म्हणाले, "काल काकींचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळं मला दुपारीच जायचं होतं, ऑपरेशन झाल्या झाल्या. पण मला थोडा विलंब झाला कारण बरंच काम होतं. नंतर मी फोन केला तर सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, आम्ही सिल्व्हर ओकला चाललोय. तुझं काम झाल्यावर तू सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचचं होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्व देत असतो. सहाजिकचं आमच्या पवार कुटुंबियांनी आम्हाला हे शिकवलं आहे. त्यामुळं मी काकींना भेटलो अर्धातास तिथं होतो. त्यांची खुशहाली विचारली. त्यांना आणखी २१ दिवसांची विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितलं आहे."
 
अर्थखातं मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, "मला अर्थखातं देण्याला शिंदे गटाचा विरोध या सर्व बातम्या माध्यमांमध्ये होत्या. त्यातील काही बातम्या ‘टेबल न्यूज’ होत्या. एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं म्हटलं, तर मलाही कळतं की, महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कुणाहीबाबत कटुता राहणार नाही, एकमेकांबद्दल समज-गैरसमज राहणार नाही असं काम करावं लागेल. शेवटी आम्ही जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी काम करतो. यात भेदभाव करण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांची बैठक बोलावतील तेव्हा उपमुख्यमंत्री आणि मंत्री असे आम्ही सर्वजण हजर राहू. त्यावेळीही मी त्या सर्वांना विश्वास देईन.” असं अजित पवार म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121