‘चॅट जीपीटी’ या नव्या क्रांतिकारी संवाद शैलीने उद्योग-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे बदल व त्यांचा व्यावसायिक क्षेत्रावर होणारे परिणाम या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या ठरल्या आहेत.
सध्याचे व्यवसाय विश्व पुरतेपणी संगणकीय म्हणजेच ‘डिजिटल’ झाले आहे. माहिती म्हणजेच डाटा, ‘कृत्रिम बुद्धिमता’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ आणि संपर्क म्हणजेच ‘कनेक्टव्हिटी’ या तीन मूलभूत घटकांवर आधारित ‘चॅट जीपीटी’ या नव्या क्रांतिकारी संवाद शैलीने उद्योग-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे बदल व त्यांचा व्यावसायिक क्षेत्रावर होणारे परिणाम या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या ठरल्या आहेत.
आता ही बाब तर सर्वमान्य ठरली आहे की, सध्या व्यावसायिक संदर्भात यांत्रिकीकरण व ‘कृत्रिम बुद्धिमता’ या बाबी सर्वात वेगाने वाढणार्या ठरल्या आहेत. विशेष सांगायचे म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमता’, ‘मशीन लॅर्निंग’, ‘बिग डाटा अॅनलॅसिस’, ‘रोबोटिक्स’ या आणि यांसारख्या घटकांमुळे या विषयांशी संबंधित माहिती तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक स्वतंत्रपणे व प्रसंगी स्वायत्त स्वरुपात कार्य करू लागल्या आहेत.
व्यक्तीच्या व्यावसायिक गरजा व अपेक्षांनुरूप संवाद-संभाषणावर आधारित निर्णय घेऊ शकण्याची क्षमता असणार्या ’चॅट जीपीटी’ सारखी पद्धती आता अधिकाधिक स्वयंभू बनू लागल्या आहेत. यामध्ये मुख्यतः मानवी संभाषणावर अनुकरण करणारा ‘चॅटबॉट’ हा संगणकांमधील कृत्रिम बुद्धिमत्ते संबंधीचा प्रोग्राम आहे. याद्वारे वापरणार्या व संबंधित व्यक्तीच्या मानवी आवाजावरून वा लिखित स्वरुपातील मजकुरानुसार अथवा दोन्ही मार्गांनी दिलेल्या स्वरुपातील अनुकरण केले जाते, हीच बाब ‘चॅट जीपीटी’ची व्यावहारिक उपयुक्तता वाढविणारी ठरली आहे. तसे पाहता मूलभूत स्वरुपात या प्रगत प्रकाराची सुरुवात दशकापूर्वी ‘कॉल सेंटर’च्या माध्यामातून झाली. ही प्रथा व्यक्ती व व्यवसाय या उभयतांच्या चांगलीच अंगवळणी पडली व सध्याही प्रचलित आहेच. या व्यवसाय-संवाद पद्धतीचा दर्जा वाढवून त्याला आर्थिकदृष्ट्या प्रभावी व व्यावहारिक संदर्भात अधिक कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने या व्यवसाय संवाद प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कर्मचार्यांचा सहभाग कमी करण्यावर विचार संशोधन व कारवाई सुुरू झाली व त्याचीच परिणीती ‘चॅट बॉट’ तंत्र जन्माला आले. यातूनच ’चॅट जीपीटी’चा जन्य होऊन वापर सुरू झाला. हा इतिहास तसा ताजाच आहे.
याचेच प्रगत स्वरूप म्हणून ’चॅट जीपीटी’चा उल्लेख करावा लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित संभाषणात्मक स्वरुपात काम करण्याचे नवे साधन होय. या प्रक्रियेला मानवीय पद्धतीने व भाषा संवादावर आधारित प्रतिसाद देण्यासाठी विशेष तंत्र प्रशिक्षणासह तयार केले गेले आहे, त्यामुळेच ‘चॅट जीपीटी’च्या संदर्भात व्यापक आशा निर्माण होणे स्वाभाविक आहे. ‘चॅट जीपीटी’ची पूर्वपीठिका सांगायची म्हणजे ’चॅट जीपटी’चा प्रारंभ सॅम अल्हमन नावाच्या व्यक्तीने एलन मस्क सोबत २०१५ मध्ये केला. या नव्या पद्धतीच्या सुरुवातीच्या केवळ पाच दिवसांत त्याचा वापर सुमारे दहा लाख लोकांनी केला व अल्पवधीतील हा प्रतिसाद विक्रमी ठरला. त्यानंतरही ही संख्या दिवसागणिक वाढतच गेली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
‘चॅट जीटीपी’ हे एक अद्ययावत सॉफ्टवेअर आहे. याचा पूर्ण अर्थ ‘जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रांसफॉर्मर’ असा आहे. यालाच आधुनिक अशा ’एनएमएस’ म्हणजेच ‘न्यूरल नेटवर्क बेस्ड् मशीन लर्निंग मॉडेल’ असेही म्हटले जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे हे नवे सॉफ्टवेअर ’रिअल टाईम सर्च’ देत नाही. याठिकाणी प्रत्यक्ष वापरणार्या प्रश्नकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांचे तत्काळ आणि त्वरित उत्तर दिले जाते. ही संवाद प्रक्रिया सध्या तरी इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. वापरण्याच्या संदर्भात सांगायचे म्हणजे वापरकर्त्याने त्याच्या गरजेनुसार लिहून कोणताही प्रश्न विचारण्यावर त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ’चॅट जीपीटी’द्वारा सविस्तरपणे दिले जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्वरित, सत्याधारित व विनाजोखीम उत्तर देण्यासाठी ’चॅट जीपीटी’ला विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही बाब विशेष वैशिष्ट्य ठरले आहे. ‘जीटीपीटी’ त्या प्रश्नकर्त्याच्या संंबंधित प्रश्नावर केवळ प्रतिक्रिया वा पर्याय न देता नेमके उत्तर देण्यात यावे, या उद्देशाने प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय मानवीय शैलीसह संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व विशाल स्वरुपातील माहिती शैलीच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रक्रियेमध्ये मानवी संवादाशी संबंधित विशेष महत्त्वाच्या अशा साद-प्रतिसाद व मत-अभिप्राय इ. पैलूंवर आधारित अभिप्रायांचा वापर करून ’चॅट जीपीटी’ला विशिष्ट व आवश्यक दिशा-निर्देशांचे पालन करत संवाद क्षमता व प्रभाव यामध्ये अधिक वाढ करण्यासाठी निष्णात बनविले जाते. त्यामुळे संभाषणात्मक संवाद साधण्याची व अगदी मानवीय संदर्भात हुबेहूब संवाद साधण्यासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे. संगणकीय संदर्भात ’मशीन लर्निंग’ व ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ या प्रगत तंत्रज्ञानाचा एकत्रित व संयुक्त स्वरुपात उपयोग केल्यामुळे ‘चॅट जीपीटी’ प्रणालीमध्ये एखाद्या वाक्यामध्ये व पुढच्या वाक्यांमध्येे संभाव्य स्वरुपात कोणता शब्द संभाव्य स्वरुपात येऊ शकतो, याचा अचूक अंदाज लावण्यासाठी संबंधित माहिती-डाटासह प्रशिक्षणाचा मुख्यतः अंतर्भाव केला जातो. या वैशिष्ट्यामुळे ’चॅट जीपीटी’द्वारा एखादा परिच्छेदच नव्हे, तर प्रसंगी पानभर मजकूर अगदी सहजगत्या लिहिला जाऊ शकतो.
‘चॅट जीपीटी’ पद्धतीची विविध वैशिष्ट्ये लक्षात घेता त्याचा व्यावहारिक व व्यवसायाच्या दृष्टीने अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी काही प्रमुख संगणक सेवा कंपन्यांनी प्राधान्यक्रमाने पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने या कंपन्यांनी आपल्या जुन्या व अनुभवी कर्मचार्यांसाठी विशेष स्वरुपाचे, तर कंपनीमध्ये नव्याने येणार्या कर्मचार्यांसाठी नव्या व मूलभूत स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी धोरणात्मक स्वरुपात प्रयत्न करून नव्या-जुन्या सर्वच कर्मचार्यांची संवादावर आधारित उत्पादकता वाढविण्याचा योजनापूर्वक प्रयत्न केला जात आहे.
यासंदर्भात उल्लेखनीय बाब सांगायची म्हणजे संगणक क्षेत्रातील अग्रणी असणार्या प्रत्येक प्रशिक्षण सत्रामध्ये ’कृत्रिम बुद्धिमत्ते’चा उपयोग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ‘इन्फोसिस’ने ‘चॅट जीपीटी’ला चालना देणार्या ‘ओपन एआय’ या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनीला सर्वांगीण सहकार्य देताना त्या बदल्यात कंपनी कर्मचार्यांना प्रशिक्षित करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे, तर ’अॅक्सेंच्युअर’ कंपनीने सुद्धा कर्मचार्यांसाठी ’चॅट जीपीटी’पद्धती प्रयोग आणि उपयोग याविषयांवर आधारित प्रशिक्षण कर्मचार्यांना देण्यासाठी व्यापक उपाय योजना केली आहे. याचेच अनुकरण अन्य कंपन्या आपापल्या व्यावसायिक गरजांनुसार करीत आहेत.
असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘चॅट जीपीटी’ पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे माहिती तंत्रज्ञान व माहितीचा व्यावसायिक उपयोग करण्याच्या मालिकेत ‘गुगल’नंतरचे लाभ आता ’चॅट जीपीटी’मुळे नव्या, प्रगत, अद्ययावत व अविलंब स्वरुपात मिळणार आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने होऊ घातलेला फायदा म्हणजे ‘चॅट जीपीटी’मुळे व त्याच्या माध्यमातून उपयोगकर्त्याला थेट प्रतिसादाद्वारे व इच्छित वा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. यातूनच व्यावसायिकतेला अद्ययावततेसह उत्पादकतेचा लाभ पण मिळू शकतो.