मुंबई : डबेवाल्यांच्या हक्काच्या घरांसाठी फडणवीसांनी पुढाकार घेतला आहे. परवडणाऱ्या घरांच्या योजनेद्वारे मुंबईच्या डबेवाल्यांना घर मिळणार आहे. भाजप नेते श्रीकांत भारतीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काही मुंबईचे डबेवालेही उपस्थित होते.
श्रीकांत भारतीय ट्विटद्वारे म्हणाले, "गेल्या अधिवेशनात मी डबेवाल्यांच्या घरा संबंधी लक्षवेधी द्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी डबेवाल्यांच्या घरांविषयी बैठक पार पडली. यात या विषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला." अशी माहिती त्यांनी याद्वारे दिली.